Dhangar Waterfall Badlapur | धनगर धबधबा बदलापूर

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

बदलापूर मधील एक निसर्गरम्य ठिकाण Dhangar Waterfall Badlapur

 महाराष्ट्रामधील बदलापूर या ठिकाणी असणाऱ्या धनगर धबधबा बद्धल आज माहिती वाचा, नेमका कसा आहे हा Dhangar Waterfall Badlapur कसा आहे? Dhangar waterfall साठी रस्ता कुठून आहे कसा आहे ? ह्या बद्धल माहिती आज या ब्लॉग मध्ये देणार आहे.

पावसाळ्यात मुंबई जवळ एक दिवसाचा पिकनिक प्लॅन करत असाल, आणि एका भन्नाट waterfall ला भेट भेट दयाची असेल, तर Dhangar waterfall badlapur हे सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य आहे, बदलापूर मध्ये खूप जागा आहे फिरण्यासाठी  कोंडेश्वर मंदिर तेथील निसर्ग म्हणजे स्वर्ग जर तुम्हाला हा अनुभव घ्याचा असेल तर एकदा बदलापूर मध्ये यावं लागेल. 

 

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

धनगर धबधबा हा बदलापूर रेल्वे स्थानकाहून अर्ध्यातासाच्या अंतरावर आहे, रिक्षाने स्वतःच्या वाहनाने धबधब्या जवळ असणाऱ्या गावात पोहोचू शकता, तिथे विडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे चालत जावं लागते, शनिवारी व रविवारी पर्यटकांची खूप गर्दी पाहायला भेटते, अक्षरशः लांब पर्यंत गाड्याची रांग लागते, शक्य तो सोमवर ते शुक्रवार या दिवसात यायला बघा. 

Dhangar Waterfall Badlapur

जर तुम्ही रोड ने येण्याचा विचार करत असाल तर मुंबई हुन दीड ते दोन तास लागतील, आणि बदलापूर रेल्वे स्थानकापासून अर्ध्या तासावर आहे, मॅप मध्ये धनगर waterfall  टाकला तरी तो मिळणार नाही Hidden Place Badlapur , Kuderan Waterfall म्हणून ओळखला जातो हा dhangar waterfall badlapur.  इथे येण्यासाठी गावातील मुलांना किंवा कोण गावातील सोबतीला घेऊ शकता.

 

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

बदलापूर हुन कोंडेश्वरचा मार्ग तुम्हाला माहित असेल तसेच पुढे या, कोंडेश्वर मंदिर कढे जात असताना जिथे पोलीस चेकिंग असते तिथून एक सरळ रोड मार्गाने गावात जायचं, जाताना छोटासा रस्ता आहे शक्य तो दुचाकी ने या मी स्वतःचा चार चाकी ने गेलेलो पण रोड थोडासा खराब आहे, शेवट पर्यंत शेवटच्या वळणावर थोडंसं चढण आहे तोच शेवटचं गाव देवळाची वाडी तिथे गाडी पार्क करा व तिथून पुढे चालत धबधब्याच्या दिशेने २०-३० मिनिटं चालत जा.

 

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

 

तसा फार भयानक ट्रेक नाही, पण धबधब्या जवळ जाण्यासाठी खूप रस्ते आहेत, योग्य तो रस्ता ते दाखवतील म्हणून गावातील कोणाला पण सोबतीला घेऊ शकता, व चांगला निसर्ग पाहू शकता, गावातून बाहेर धबधब्याच्या दिशेने जाताना निसर्गाचा विहिंगमय नजारा दिसतो, सर्वत्र हिरवीगार डोंगर तसेच छोटासा झरना, छोटासा ओढा दिसतो, काही लोक इथेच पावसाळ्यात पाण्याचा आनंद घेतात.

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

धनगर धबधबा हा मुबई, ठाणे व कल्याण मधील पर्यटकांना जवळचा आहे, त्याच बरोबर खास बात म्हणजे तिथलं निसर्गाचं सोंदर्य खूप घायाळ करते. मित्रांनो धनगर वॉटरफॉल ला जात असताना मधेच वाटेत नास्ता वैगरे करू शकता, छान प्रकारे पावसाळ्यात व निसर्गाच्या सानिध्यात छोटासा स्टाल वाटेत मिळेल तिथे गरमागरम चहा, वडापाव व भज्या मिळेल.

 

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

 

तसेच धनगर वॉटरफॉल च्या जवळ पाहण्यासारखी ठिकाण आहेत, वॉटरफॉल ला जात असताना छान ओढा लागतो तिथे तुम्ही छान फोटो काढू शकता selfie घेऊ शकता व आपल्या परिवारासोबत पावसाळी सहल आनंद घेऊ शकता, तसेच त्या जवळ कोंडेश्वर मंदिर आहे तेथील धबधबा (पावसात बंद असतो) व त्या मागील भला मोठा डोंगर आहे आणि त्या लागत श्री मलंगगड ची डोंगर रांग आहे व हिरवळ प्रदेश आहे.

 

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

 

बाकी मित्रांनो धनगर वॉटरफॉल ची उंची तर काय माहित नाही पण बर्यपैक्की खूप उंच आहे, इथे rappling वैगरे असं काही होत व रविवारी खूप अशी गर्दी असते म्हणून वर सांगितल्या प्रमाणे प्रोग्राम करा व भेट द्या इथे, पावसाळा ऋतू चांगला आहे, हिवाळ्यात व उन्हळ्यात इथे काहीच नाही, जर चार चाकी गाडी ने येत असाल तर जवळच्या गावात गाडी पार्क करू शकता.

 

Dhangar Waterfall Badlapur
Dhangar Waterfall Badlapur

 

Chikhloli Dam and Waterfall व kondeshwar temple badlapur करायचा विचार करत असाल तर dhangar waterfall ला सुद्धा भेट देऊ शकता संपूर्ण माहिती आपण या ब्लॉग मध्ये दिली आहे जसे कि dhangar waterfall address, dhangar waterfall route, dhangar waterfall how to go आणि badlapur to dhangar waterfall distance हे सर्व इंग्लिश मध्ये दिल असलं तरी तुम्ही मराठी मध्ये संपूर्ण वाचू शकता. 

तर मित्रांनो कशी वाटली हि माहित जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या परिवारामध्ये व मित्र मैत्रिणीशी शेअर करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली कृपा करुन कंमेंट मध्ये सांगू शकता.  

मित्रांनो बाकी माहिती साठी विडिओ पाहू शकता, विडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाईक व शेअर करत चॅनेल ला subscribe करू शकता.

धन्यवाद ।।

#Waterfalls of India #Waterfalls of Maharashtra #Dhangar waterfall  #oneday picnic #badlapur waterfall  #kondeshwar #Chikhloli Dam and Waterfall #Monsoon Getaways Photography #Weekend Getaways #Weekend Getaways near Mumbai

1 thought on “Dhangar Waterfall Badlapur | धनगर धबधबा बदलापूर”

Leave a Comment